ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साह पूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला, याप्रसंगी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, नगरसेवक सागर ठाकूरवार, विकास अवघडे,संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी, प्राचार्य निर्मला ठावरी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्राध्यापक विजय आकनूरवार यांनी महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व इतर मान्यवरांनी सुद्धा महिला दिनाबद्दल मार्गदर्शन केले, याप्रसंगी शाळेत पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.