ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्यात मेंढपाळ ठार

मुल एमआयडीसी परिसरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

*वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी*

सावली – मुल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार रा. चांदली बुज. ता. सावली यास ठार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

    सावली परिक्षेत्र अंतर्गत टेकाडी बीटमध्ये चिमढा येथील अरविंद केळझरकर यांचे शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप मुक्कामी होता.निलेश कोरेवार व योगेश कोरेवार हे दोघेही भाऊ सोबत असतांना रात्रौ 11.30 च्या दरम्यान वाघाने हल्ला करून निलेश कोरेवार याला परकटत नेले.

याबाबतची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना देण्यात आली असता पथकासह शोधमोहीम सुरु केली. शोध मोहिमे दरम्यान राजुरी स्टील अँड पॉवर कपंनीच्या मागील जंगलात मृतदेह आढळले.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या नरभक्ष वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये