पोलीस स्टेशन आर्वी येथील चोरीचा गुन्हा उघड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन आर्वी जिल्हा वर्धा येथे दिनांक 01/03/2025 रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीमध्ये लागणारे लँट्रल पाईपचे 12 बंडल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा फिर्यादवरुन दिनांक 03/03/2025 रोजी अपराध 173/2025 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहीती वरुन आरोपी नामे सुहर्ष विनायकराव महाकुलकर वय 30 वर्ष रा. खानगाव पोष्ट बोथली ता. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. C/O शेख कयुम, धनोडी बहादरपुर ता. आर्वी जि. वर्धा याला ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन सखोल विचारपुस केली असता., गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे प्रकल्पामध्ये ठिबक सिचंनासाठी लागणारे लँट्रल काळ्या रंगाचे पाईपचे एकुन 12 बंडल प्रति बंडल 5000/- रुपये प्रमाणे एकुन 60,000/- रुपयाचा संपुर्ण मुद्देमाल सुहर्ष विनायकराव महाकुलकर वय 30 वर्ष रा. खानगाव पोष्ट बोथली ता. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. C/O शेख कयुम, धनोडी बहादरपुर ता. आर्वी जि. वर्धा याचे ताब्यातुन पुराव्याकामी पंचासमक्ष जप्त केला.