ख्रिस्तानंद चौकात ऑटो युनियन संघटनेच्या वतीने महाप्रसादचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
विदर्भ सहा सिटर ऑटो युनियन संघटना ब्रह्मपुरी-नागभीड तसेच मित्र परिवार खिस्तानंद चौक ब्रम्हपुरीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
महाप्रसाद वितरण सोहळ्याच्या उद्घाटक म्हणुन सुरेश मेंढे से. नि. पोलीस ब्रम्हपुरी, अध्यक्ष म्हणून झिलपे व्यापारी ब्रम्हपुरी, प्रमूख अतिथी गोवर्धन दोनाडकर पत्रकार ब्रम्हपुरी, राहूल लाखे ट्राफिक पोलिस,सुनिल गुड्डेवार, हरिष सोरते,आदी मान्यवर उपस्थित होते. विदर्भ सहा सिटर ऑटो यूनियन संघटना खिस्तानंद चौकातील दरवर्षीमहाशिवरात्री यात्रा निमित्याने महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेतात. त्यामूळे मान्यवरांनी सर्व संघटनेच्या लोकांचे अभिनंदन करून कौतून केले व महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता संघटनेचेउपाध्यक्ष कृष्णा नागोसे, सचिव लेखानंद मेश्राम, महेश गोटेफोडे, प्रदीप अडेटीवार, सुभाष सोरते, विशाल मेश्राम, संपत मेश्राम, सुरेश मुळे, सुरेश मुळे, सुनील गायधने, धनराज मानकर, देवा अमृतकर, मदनगोपाल नागोसे, प्रदीप धोंगडे, व खिस्तानंद चौकतील मित्र परिवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.