ताज्या घडामोडी

मराठी भाषा गौरव दिन निमित्त आंतर शालेय गितगायन स्पर्धा संपन्न – आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा व स्वरप्रीती कला अकादमीचा उपक्रम

स्पर्धेत 150 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग - स्टेला मॉरिस स्कुलने पटकावले विजेतेपद

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

मराठी भाषा गौरव दिन निमित्त आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा व स्वरप्रीती कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारीला शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात राजुरा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश शाळांच्या चमूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाला इंग्रजी भाषेच्या शाळांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्य आयोजित ह्या स्पर्धेत सहभागी शालेय संघांनी एकाहून एक सरस व मराठी भाषेची महती विषद करणारी गाणी सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात अलका सदावर्ते आणि आरोही टीम यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य’ या मराठी गीताने झाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट द्वितीय क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळा चिंचोली खुर्द तर तृतीय क्रमांक ऑर्चिड स्कूल राजुरा यांनी प्राप्त केला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार वामनराव चटप ह्यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सचिव अविनाश जाधव तसेच मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार संजय धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर मुख्य अतिथी म्हणून आकाशवाणी चंद्रपूरच्या निवेदिका व योगशिक्षिका हेमा बहादे, साजिद हुसेन बियाबानी, मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा स्वरप्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते, आरोही सुगम संगीतच्या केंद्रप्रमुख अलका सदावर्ते, प्राचार्य संभाजी वरकड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दाचेवार, शाळांचे प्रमुख मसूद अहमद, अभिजीत धोटे, समीर चिलावार तसेच तसेच केंद्रे, उपप्राचार्य राजेश खेरानी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संजय धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरप्रीतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री संजय भाऊ धोटे यांनी स्वरप्रीती व आरोही टीमचे विशेष करून सदावर्ते दांपत्य यांचे भरभरून कौतुक केले व सांस्कृतिक क्षेत्रात संगीताचा वारसा राजुराला 25 वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवला असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला तो टिकविण्यासाठी अशा मराठी स्पर्धेची गरज असुन 15 शाळेचे 150 विद्यार्थी गायन मराठीतून करणार असल्याबद्दल विशेष  कौतुक केले. उद्घाटक अविनाश जाधव यांनी शिवाजी महाविद्यालयाचे सभागृह हे चांगल्या कार्यक्रमाकरीता माजी आमदार स्व. प्रभाकर मामुलकर ह्यांनी निर्माण केले होते त्यामुळे सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यासाठी संस्था सहकार्य करेल असे सांगितले. हेमा बहादे यांचा स्वरप्रितीच्या वतीने शाल श्रीफळ साडीचोळी व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रस्तावनेतून केंद्रप्रमुख अलका सदावर्ते यांनी स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, संचालन रेणू देशकर तर आभार स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी मानले. 150 विद्यार्थ्यांचे समूहगीत परीक्षण श्री सचिन जुमडे व रिद्धी राऊत यांनी परीक्षण व निकाल जाहीर केला. स्पर्धेत सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोही टीम स्वरप्रीति टीम तथा सह आयोजक टीम छोटू सोमलकर, सुनील रामटेके, अजय पुणेकर, स्वरूप झंवर, अनुष्का रैच, रूपाली वरवाडे, रेखा रागीट, स्वतंत्रकुमार शुक्ला, प्रतिभा भावे, रचना देवगडे, प्रतिभा भावे, लता कुलमेथे, सुनिता कुंभारे, करुणा गावंडे, जयश्री मंगरूळकर, वीणा देशकर, ज्योती कोरडे, प्रकाश पचारे तथा सर्व सदस्य व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये