ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलांडी येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था गोपालन केंद्र कोलांडी नंदप्पा तहसील जिवती येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला.
या संस्थेच्या माध्यमातून महाशिवरात्री पर्वावर ध्यान साधना आणि यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात दिनांक 25 फेब्रू 2025 रोज मंगळवार ला भक्तांचे आगमना सोबतच कलश पूजन,शिव महिमा स्तोत्रम,आरती, महाप्रसाद संपन्न झाला आणि दिनांक 26फेब्रु 2025 बुधवार ला पहाटे 3 वाजे पासून 11वाजे पर्यंत साधकांचे सामुहिक ध्यान शिवलिंग अभिषेक महा सत्संग या सारखे विविध कार्यक्रम पार पडले.

त्यानंतर महाशिवरात्री यात्रा उत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमात ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा समिती च्या वतीने सत्कार सोहळा तसेच परिसरातील गरीब महिलांना वस्त्रदान करण्यात आले त्या सोबतच संस्थेतील भविष्य कालीन कार्याची माहिती देण्यात आली. भक्तांच्या दृष्टीने उपासाचा नाष्टा, रताळ,भगर ,साबुदाणा खिचडी चे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गडचांदूर व्यापारी वर्गातील प्रतिष्ठित भक्त मंडळींनी मोलाचे योगदान दिले.

श्री व्यंकटेश बालसानिवार,श्री संतोष भाऊ छाजेड,श्री स्वप्नील छाजेड, श्री शिरीष भाऊ भोगावार, श्री डॉ किसनराव भोयर,श्री डॉ प्रदीप ठाकरे,श्री श्रीकांत झुल्लुरवार, श्री हंसराज भैया चौधरी,श्री धनंजय छाजेड,श्री धनराज शेखावत, श्री विठ्ठल गोरे श्री महादेव हेपट श्री सुनील झाडे श्री दिपक वर्भे श्री प्रशांत उपलेंचवार सर,सौ निता उपलांचवार,श्री प्रशांत गोखरे, सौ किशोरी गोखरें, आणि इतर तसेच आश्रमाचे सेवेकरी श्री संजय भाऊ शिंदे श्री व सौ कोडापे पुजारी श्री केशव वाघमारे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव देवाळकर, बळीराम हेपट,अनिल वडस्कर, धर्मराज पारधे, अशोक केवट, संतोष पोडे,संतोष झाडे दिनकर काळे, नंदकिशोर चिडे, प्रदीप कुंभे, सुधाकर तोडासे,वसंता काळे, गजानन काळे, अविनाश खणके बंडू सोयाम,पुंडलिक मोरे मारुती बुटले,प्रवीण माणूसमारे,सुरेश लोहे,नामदेव वांढरे,संतोष कुंमरे,नरेंद्र बोरकर, लोकनाथ मेंढे,विजय निमकर, दीपक जोगी,अरुण भोयर,श्री गेडाम,विठ्ठल कुचनकर, संजय शिंदे,केशव वाघमारे, दिनकर चौधरी ,अप्पाराव देवकते,परशुराम मोकन पल्ले, संतराम श्रीगणवाड, नंदाताई देवाळकर, शुभांगी हेपट, मंदाताई वडस्कर, मंगला देहारे, विमल केवट,पुष्पा साबळे,शामल पारधे, आशा झाडे, शोभा हुलके, विना मडावी, कुसुम तोडासे,शकुंतला काळे,इंदिरा बुटले, वनिता माणूसमारे,वैशाली चिडे,सुषमा जोगी,अनुराधा शिंदे, गवळण वाघमारे, आणि इतर सर्व सेवा करांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये