विद्यानिकेतन कॉन्हवेट पारडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दिनांक 21/02/24 ला विद्यानिकेतन काॅन्हवेट पारडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरनिय श्रीधरराव गोडे साहेब तर उद्घघाटक शंकर तलांडे केंद्रप्रमुख पारडी हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून अनंता गोडे, गणेश गोडे, रामदास कुमरे, झुलकंटीवार, मैदमवार, विकास दरणे भारत कन्नाके आणि सर्व शा.व्य.स.पदाधिकारी,ग्रा.पं. चे सरपंच निलेश वरखडे, उपसरपंच सुहास गोडे व ग्रा.पं.पदाधिकारी,संस्थेचे संचालक दिनेश भोयरव गावातील प्रतिष्ठित नागरिक.विद्यानिकेतन काॅन्हवेटचे मुख्याध्यापक भुषण तलांडे आणि सर्व टिचर स्टाप उपस्थित होते.
या निमित्ताने चित्रकला, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, शुध्दलेखन स्पर्धा, घेऊन संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन पाटील सर तर आभारप्रदर्शन कु.कुरेशी मॅडम हिने केले.