राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर येथे शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता.
जिल्ह्यातील मोखाळा, सावली, मूल, चीचपली, लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व इतर मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. तसेच विश्रामगृह ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढून जल्लोष केला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मेळाव्याला सुरवात करण्यात आल्यानंतर जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, कार्यकर्त्यांच्या समस्येबाबत तसेच पक्ष संघटने विषयी माहिती दिली. पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात किमान दोन विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने लढव्याव्या हे सुद्धा प्रदेश अध्यक्ष तटकरे ह्यांच्या लक्षात आणून दिले.
शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील अडचणी, महिला, निराधार बालक, महिला बचतगट, तसेच कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा दृष्टीकोनातून आपले विचार मांडले.
आपल्या कामाच्या व्यसतेतेमुळे सुरवातीला संपर्क मंत्री धर्मरावबाबा आत्राम साहेब ह्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सामाजिक न्याय विभाग व ओ.बी. सी विभागाचे प्रदेश अध्यक्षांनी देखील मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण ह्यांनी स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच चंद्रपूर येथे महाराष्ट्र सरकारच्या विभागाचे सहकार्य घेऊन रोजगार मेळावा घेण्यात येईल असे सांगितले. सोबतचं युवक संघटन वाढविण्याच्या संदर्भात सूचना युवक ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ रुपालिताई चाकणकर ह्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण, तसेच महिलांवर होणारे अत्याचार, तसेच महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना व केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी लवकरच चंद्रपूर येथे कार्यक्रम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब ह्यांनी पक्ष संघटन, वाढविण्यासठी दोन्ही अध्याक्ष्यांना सूचना केल्या तसेच शेतकरी, कामगार, तसेच गरजू लोकांच्या पाठीशी नेहमी खंबीर पणे उभे राहून त्यांचे शासन स्तरावर असलेले सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक पणे जिल्हाध्यक्क्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहनार असे जाहीर करीत
तसेच मेळाव्याचे उत्तम नियोजन केल्या बद्दल आयोजकांची स्तुती आपल्या मार्गदर्शन भाषणात केली.
कार्यकर्ता मेळाव्यात आबीद अली, सुनील काळे, विलास नेरकर, अविनाश राऊत, शरद जोगी, अरविंद रेवतकर, महेंद्रसिंग चंदेल, राकेश सोमानी, अभिनव देशपांडे, सुजित उपरे, नौशाद शेख, चारुशीला बरसागडे, विपिन झाडे,संजय खेवले,कुमार पॉल, अमोल ठाकरे,रोशन फुलझेले,आकाश निरटवार,कोमिल मडावी राहुल वाघ,संजय बिस्वास,मनोज सोनी,यांचेसह तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष, सर्व नगरसेवक, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध सेलचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याच्या समारोपीय भाषणात कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे तथा मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांनी मानले.