गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटर सायकल चोरी करून धुमाकुळ घातलेल्या टोळीस जेरबंद

पोलीस स्टेशन आर्वी, जिल्हा वर्धा येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 08/11/2023 चे 00/00 ते दि. 09/11/2023 चे 06/00 वा दरम्यान यातील फीर्यादी नामे मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा हे त्याचे मालकीची HERO कंपनिची ISMART मोटर सायकल क MH-32. ΛΑ- 2924 जीचा Chassis कमांक MDLHA12ACE9E06726 असा असुन की अंदाजे 30,000/रू चा माल आपले घरासमोर उभे करून झोपले व सकाळी उठून पाहीले असता फीर्यादीला त्यांचे घरासमोर उभी करून ठेवलेली मोटार सायकल दिसुन आली नाही, कोणीतरी अज्ञात चोरटयाने फीर्यादिचे संमतीवाचुन फीर्यादिचे मोटार सायकल लबाडीने चोरून नेल्याने फीर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्र. 88/2024 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान मुखबीर कडुन मिळालेल्या माहितीवरून, दिनांक 02.07.2024 रोजी एक ईसम मौजा धनोडी येथे चोरीची मोटर सायकल विक्री करीता घेवुन येत आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पोलीस स्टेशन आर्वी येथिल गुन्हे प्रकटी करण पथकाने सापळा रचुन आरोपी नामे नयन मिलींद गायकवाड वय 19 वर्ष रा, कोसुर्ला ता. हींगणघाट जि वर्धा याचे ताब्यातून त्याने चोरीस केलेली मोटर सायकल एक काळया रंगाची HONDA कंपनिची UNICORN मोटर सायकल कि. अंदाजे 70,000/रू ची जप्त केली.

सदर आरोपीस पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन आर्वी अपराध क्र. 88/2024 कलम 379 भादवि मधील गणपतीवार्ड आर्वी येथिल चोरीस गेलेली HERO कंपनिची ISMART मोटर सायकल क MH-32. AA- 2924 बाबत त्यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याचे ईतर साथीदारांसह सदरची मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने तसेच वर्धा जिल्हयातुन पोलीस स्टेशन आर्वी, सेवाग्राम, सावंगी मेघे, अल्लीपुर, खरांगणा, सेलु येथुन अंदाजे 15 ते 20 मोटार सायकली चोरी करून कामरगाव जि. वाशिम येथिल साथीदारांना विक्री केल्याचे सांगितले वरून तात्काळ मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे आदेशान्वये मा. पोलीस निरीक्षक सा. पोलीस स्टेशन

आर्वी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आर्वी येथिल गुन्हे प्रकटी करण पथक कामरगाव जि. वाशिम येथे रवाना करून त्यांनी आरोपी नामे 1) नयन मिलीद गायकवाड वय 19 वर्ष रा, कोसुर्ला ता. हींगणघाट जि वर्धा 2) साहील विठठल डोंगरे वय 19 वर्ष रा, येसंबा ता, जि, वर्धा 3) सययद सलमान सययद साबीर वय 22 वर्ष रा. मसला / कामरगाव ता. कारंजा जि, वासीम 04) मोहम्मद फैजल मोहम्मद फीरोजवय 20 वर्ष रा, कामरगाव ता. कारंजा जि. वासीम तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 4 मोटर सायकली जप्त करून आरोपी क्र. 01 ते 04 यांचा विद्यमान न्यायालयाकडुन पीसीआर प्राप्त करून पीसी.आर. दरम्यान आरोपीतांचे ताब्यातुन कामरगाव ता. कारंजा जि. वासीम येथुन 13 मोटर सायकली जप्त केल्या. अशा वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातुन चोरीस गेलेल्या एकुण 18 मोटर सायकली जु. कि. 13,50,000 रू. च्या जप्त करण्यात आल्या.

मोटर सायकल चोरी करणारे आरोपीचे नाव :-

1) नयन मिलींद गायकवाड वय 19 वर्ष रा. कोसुर्ला ता. हींगणघाट जि वर्धा 2) साहील विठठल डोंगरे वय 19 वर्ष रा, येसंबा ता. जि. वर्धा दोन विधी संघर्षित बालक

चोरीची मोटर सायकल विकत घेणाऱ्या आरोपीचे नाव :-

1) सययद सलमान सययद साबीर वय 22 वर्ष रा, मसला / कामरगाव ता, कारूंना जि, वासीम 2) मोहम्मद फैजल मोहम्मद फीरोजवय 20 वर्ष रा, कामरगाव ता. कारंजा जि, वासीम

सदरची कार्यवाही मा. श्री नुरुल हसन, पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा, मा. श्री डॉ. सागर कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा आणि मा. श्री देवराव खंडेराव उपविभागीय पोलीस अधिकारी, सा. आर्वी यांचे निर्देशाप्रमाणे श्री यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. आर्वी यांचे मार्गदर्शनात पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा रामकिसन कासदेकर, पोहवा दिगांबर रूईकर, पोहवा अमर हजारे, नापोशि प्रविण सदावर्ते, पोशि राहुल देशमुख, निलेश करडे, पोशि स्वप्नील निकुरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये