ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्त राजे शिवछत्रपतींना अभिवादन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीप्रित्यर्थ राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक, राष्ट्रऋषी दिवंगत माधवराव गोळवलकर गुरूजी यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी या दोन्ही महान विभुतीच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझले, सुरेश भाकरे, मयुर भोकरे, प्रविन गिलबिले, कमल कजलीवाले, राजवीर चौधरी, प्रणय डंभारे, राहुल बोरकर, शैलेश दिंडेवार, रोहीत दुरडकर व इतरांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये