ट्रक मोटर सायकलीच्या धडकेत मोटर सायकलस्वार जागीच ठार
वरोरा-वणी महामार्गावरील पाटाळा पुलावर घडला भीषण अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील माजरी – पाटाळा क्षेत्रातील वरोरा – वणी 930 महामार्गाच्या पाटाळा उड्डाण पुलावर भीषण अपघात दि. 16 फेब्रुवारी रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान झाला.
त्यामधे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना हीट अँड रन असल्याची शक्यता नागरिकांनी दर्शविली आहे. या अपघातात इसम नामे गिरीश अशोक ढवस (२३)हा वरोरा येथून वणी कडे जात असताना पाटाळा वर्धा नदीच्या पुलावर वणी कडून वरोरा कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच बी. जी.7001 चा चालक नामे राजकुमार दशरथ कैथल रा. माजरि कॉलेरी यांनी आपल्या ताब्यातील ट्रक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवून मोटार सायकल क्रमांक एम. एच 34 बि एक्स 8641 हिला समोरून जोरदार धडक देवून अपघात घडवुन आणला अपघाता दरम्यान मोटार सायकल चालक गंभीर जखमी होऊन पडला असता शेंबळ येथील टोल नाक्यावर असणारी रुग्णवाहिकेला घटनास्थळी नागरिकांनी बोलवली , व अपघातीला उपचारादरम्यान उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान माजरी पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसांनी पाठलाग करवून अपघाती ट्रक वरोरा हद्दीतून ताब्यात घेतला.
त्यानंतर चालकाला नागरिकांनी मारहाण केल्याने आरोपीस चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी रेफर केले.माजरी पोलिसांनी आरोपी विरुद्ध अप क्रमांक 13/2025 कलम 281,125,( बी),106(1) बी. एन. एस. सह कलम 185 मो. वा.अधिनियम कायदा अंतर्गत ट्रक चालक आरोपी वर गुन्हा नौंद केला असून पुढील तपास माजरी स.पो.नी अमित पांडे यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलिस करीत आहेत.