ताज्या घडामोडी

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

शहरातील नामांकितांनी केला सामुहिक योगाभ्यास

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असुन ह्या दिवसाचे औचित्य साधुन राजुरा शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या पटांगणावर सामुहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी भारताला जी – २० चे अध्यक्षपद मिळाले असून “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेवर ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण भारत भर परिषदा चालू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या योग दिवसाची संकल्पना भारत सरकारने “वसुधैव कुटुंबकम्” ठेवलेली आहे.

राजुरा शहरातील विविध क्षेत्रांतील गणमान्य लोकांनी स्वयंस्फूर्तीने योगाभ्यासाला उपस्थिती लावली. राजकीय, शासकीय कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी ह्यांचेसह सर्वसामान्य नागरिकांनी योगाभ्यास करून सुदृढ जीवनाचे महत्त्व समजून घेतले.

श्री शिवाजी महाविद्यालय

शिवाजी महाविद्यालयातील विविध विद्या शाखा, राष्ट्रीय सेवा योजना पथक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तथा पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार सकाळी ५.३० ते ७.३० दरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

५००० वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. कोरोना महामारीमधे सुदृढ शरीराचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहेच त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे एक दिवसापूरते प्रतिकात्मक न राहता प्रत्येक गावखेड्यामध्ये योगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरूपी होणे आवश्यक आहे योगाचे महत्व आणि योगदान पटवून देण्यासाठी योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे, तसेच सुदृढ पिढी निर्माण करणे हे योग दिनाचे उद्दिष्टे ठेवून नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी योग प्रशिक्षक म्हणून हरिभाऊ डोर्लीकर, पी.एस. उराडे, तसेच पतंजली योग समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून उपस्थिताना योगाचे धडे व योगाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. संजय धोटे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ. सुदर्शन निमकर व माजी जि.प. सदस्य तसेच आ. शि. प्र. म. राजुरा चे सचिव अविनाश जाधव उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून साजिदहुसेन बियाबानी, ॲड. अरुण धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेराणी, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संचालक डॉ. आनंद रायपुरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की तसेच राजुरा शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील संपूर्ण कर्मचारी, रासेयो चे स्वयंसेवक या प्रसंगी उपस्थित राहून योगाचे धडे घेतले.

आदर्श शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न.

बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमीक विद्यामंदिर, आदर्श हायस्कुल, राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट -गाईड युनिट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श शाळेच्या प्रांगणात सकाळी 7:00 ते 9:00 दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी योग शिक्षक जे . डी. नंदरधने  होते. प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, अल्का गंगशेट्टीवार, अंजली गुंडावार, वीणा देशकर तसेच पतंजली योग समितीचे सदस्य तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समितीच्या संघटिका, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, रुपेश चिडे, राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट -गाईड युनिट चे विद्यार्थी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

इन्फंट कॉन्व्हेंट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इन्फट कॉन्व्हेंट, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय आणि पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध योगासन व ध्यान आसनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यात उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्फंट जीजस सोसायटीचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश एलकेवाड, राऊंड ऑफिसर निबुद्धे, पतंजली योग समिती राजुराचे संयोजक प्रा. दत्तात्रय मोरे, मुखरुजी सेलोटे, पुंडलिक उराडे, हरिभाऊ डोर्लिकर, ओमप्रकाश गंगशेट्टीवार, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल शेंडे, इन्फन्ट च्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह पतंजली योग समितीचे सदस्य, इन्फन्ट् संस्थेअंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये