ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सनराईज योगा ग्रुप तर्फे जागतिक योग दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सनराईज योगा ग्रुप तर्फे जागतिक योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन संयोजिका कुंतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, नगर परिषद गडचांदूर, जिल्हा परिषद शाळा गडचांदूर, गोपालपुर , पिंपळगाव, उपरवाही, येथे योग प्रशिक्षण देण्यात आले, कुंतल चव्हाण, स्वाती झाडे, सरोज मडावी, डॉ कृष्णा ठाकरे, सुरेखा ठाकरे, पल्लवी सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छाया टोंगे, वैशाली पारधी, रिना मंदे, लीना लांजेवार, परचाके , मंगला खामनकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

योग शिबिरात पुरुष महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कुंतल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सनराईज ग्रुप गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत शेकडो महिलांना संघटित करण्याचे काम करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये