ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्षयरुग्णाला फुड बास्केट देऊन उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे युनानी दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :-युनानी दिवशी निमित्त महान स्वातंत्र्यसेनानी आणि भारतात आयुर्वेद आणि युनानी औषध उपचारपद्धतींना पुनरुज्जीवित करणारे चिकित्सक हाकिम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 11/2/2025 ला मंगळवार ला उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे जागतिक युनानी दिवस उपजिल्हा रुग्णालया चे वैद्यकिय अधीक्षक डॉ प्रीतम खंडाळे सर यांचे मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. प्रथम हाकीम अजमल खान सर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांनी युनानी दिन बाबत माहिती सांगितली.

        या कार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉ अब्दुल रब शेख वैद्यकिय अधिकारी यांनी निक्षय पोषण आहार योजना अंतर्गत एका क्षयरुग्णाला फूड बास्केट देऊन दत्तक घेण्यात आले.

       या कार्यक्रमा ला वैद्यकीय अधिकारी डॉ डोकीरमारे सर डॉ जीवने सर, डॉ ठक्कर सर, डॉ ढोंगे सर, डॉ कामडी सर, डॉ नागमोती सर, डॉ मेंढे सर, डॉ नाकाडे सर, डॉ नाकाडे मॅडम, डॉ सिडाम सर, डॉ खरकाटे मॅडम, डॉ पर्वणी मॅडम TB H.V. श्री दिग्विजय कोसे तसेच क्षयरोग फील्ड ऑफिसर (PPSA) रवींद्र गाठे, श्री पाथोडे सर, श्री रामदे सर ठाकरे सिस्टर, धात्रक सिस्टर, बंडुजी उपासे तसेच इतर वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये