घरफोडीसह वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड
आरोपीचे ताब्यातून एकूण 64 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, पो. स्टे. वर्धा येथे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून नमूद कलमाने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोध घेत असता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून नमूद आरोपीस ताब्यात घेऊन त्याची कस्सून सखोल चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हे केल्याचे कबूल केल्याने व एकूण जुमला किंमत 64,700 रू चा मुद्देमाल त्याचे ताब्यातून जप्त करून सदर गुन्हे उघड करण्यात आलेले आहे. सदर आरोपी 1) अर्जूनसिंग सिकंदसिंग बावरी वय.28 वर्ष रा.तळेगाव (बेडा) ह.मु.सावंगी शिख बेडा वर्धा जप्त मुद्देमलासह पुढील कारवाई करता पो स्टे वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा तसेच सायबर सेल चे पो.हवा. दिनेश बोथकर यांनी केली.