ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श शिक्षक काकासाहेब नागरे यांची दिल्ली येथे आयोजित प्रशिक्षण साठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पी एम श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निवड झालेल्या शाळेतील मुख्याध्यापकांकरिता आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठीआदर्श शिक्षक काकासाहेब नागरे यांची निवड करण्यात आली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून साकारलेल्या पीएम श्री या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वडगाव या शाळेची पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील शाळेतील मुख्यधापकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एनसीईआरटी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे याकरिता चंद्रपूर जिल्ह्यामधून काकासाहेब बाबुराव नागरे ,सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा वडगाव यांची निवड करण्यात आली आहे त्याकरिता त्यांना जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षणाधिकारी प्राथमिक राजकुमार हिवरे यांनी प्रशिक्षणाकरिता कार्य मुक्त केलेले आहे व पंचायत समिती कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी यांचे सह समस्त शिक्षक बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपरोक्त कार्यशाळेच्या माध्यमातून आवश्यक क्षमता सकारात्मक शाळा विकसन दृष्टिकोन निर्माण करणे तांत्रिक कौशल्य व मार्गदर्शन करणे समुदायास सहभागी करून कार्यत्मक नियोजन व एकत्रित सहभाग अंमलबजावणी करून एक आदर्श शाळा निर्माण करण्याकरिता व ती शाळा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल याकरिता सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये