ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इलेक्ट्रॉनिक (वस्तू) दुकान : फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक

सदरचा एकूण संपूर्ण माल जप्त ; आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 30.01.2025 रोजी फिर्यादी मोहण रामभाउजी इंगोले, रा. देवळी यांचे मोहन इलेक्ट्रानीक्स दुकानातुन आरोपीतांनी कॅश बँकेच्या चेकवर बनावटी सही करून फिर्यादीचे दुकानातुन एक सॅमसंग कंपणीचा एलईडी टिव्ही कि. 34,500 रु. चा नेला. व दिनांक 31.01.2025 रोजी फिर्यादीचे दुकानातुन एक गोद्रेज कंपणीची ए.सी किंमत 33,000 रूचा नेला व दुसरे दिवसी फिर्यादीचे फोनवर आरोपीने फोन करून सांगीतले की, माझे बैंक अकाउंटमध्ये पैसे कमी आहे. मी क्युवार कोड देतो त्यावर 12,000 रू पाठवा असे सांगीतल्याने फिर्यादीचे लक्षात आले की माझी फसवणु झाली आहे.

तेव्हा फिर्यादीने सदर चेक बँकेला लावला असता. सदर चेकवर बनावटी सही असल्याचे बँकेने पत्र दिले. करीता दिनांक 05.02.2025 रोजी फिर्यादीने पोलीस स्टेशन देवळी येथे दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. 103/2025 कलम 118(4), 336(2), 338, 336(3), 340(2), 3(5) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात मा. सहा. पोलीस अधिक्षक, श्री. राहुल चव्हाण, (भापोसे) उप विभाग पुलगांव यांचे विशेष मार्गदर्शनाखाली तपास पथक मध्ये पोहवा संतोष कुकडकर, पोशि अनिकेत तळवेकर यांना नेमुण आरोपी शोध कामी नाशिक येथे रवाणा करण्यात आले सदर गुन्हयातील आरोपी कमांक 1) चांगदेव मगण मोहिते, वय 39 वर्ष, रा.घर नंबर 306/002 बेलदार वाडी दिंडोरी रोड म्हसरूड नाशिक जिल्हा नाशिक, 2) किरण ब्रम्हदेव सरदार वय 34 वर्ष, रा. सावित्रीबाई फुले वसाहत अमृत धाम पंचवटी नाशिक जिल्हा नाशिक यांना गुन्हयातील मुददेमाल एक सॅमसंग कंपणीचा एलईडी टिव्ही कि. 34,500/-रू, व एक गोद्रेज कंपणीचा ए.सी किंमत 33,000 रू असा जुकी 67500 रू चे मालासह 12 तासाचे आत अटक करून पोलीस स्टेशन देवळी येथे आणले व गुन्हा उघडकीस आणला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये