देऊळगाव राजा येथे अजितपर्व युवा जोडो अभियान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दिशा विकासाची,पुरोगामी विचारांची हे ब्रीद उराशी बाळगून वाटचाल करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं अभियान म्हणजे अजितपर्व, युवा जोडो अभियान चा कार्यक्रम दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी देऊळगाव राजा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोज भाऊ कायंदे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा ॲड. नाझरे काझी, प्रदेश उपाध्यक्ष शेखर बोन्द्रे , माजी नगराध्यक्ष सिंदखेडराजा देवीदाभाऊ ठाकरे , जुनेद अली, विष्णू बोन्द्रे, लक्ष्मण कव्हळे पाटील, सदाशिव मुंढे, गजानन काकड, यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यकर्माची सुरवात माता रमाई च्या जयंती चे औचित्य साधून माता रमाई च्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
नंतर सिंदखेडराजा मतदारसंघाचे युवा आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी उपस्थित सर्व युवांसोबत हितगूच साधून मार्गदर्शन करतांना सांगितले की सर्व युवकांनी आपले शिक्षण नोकरी व्यवसाय यासोबतच सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येणे काळाची गरज आहे आजचा युवा म्हणजेच या देशाच राज्याचं उद्याच भविष्य आहे. नंतर पुढे अध्यक्षीय भाषणामध्ये मा. सुरज दादा चव्हाण यांनी यांनी जमलेल्या सर्व युवक व युवतीसोबत संवाद साधला.कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही बहुजनांची पार्टी आहे.म्हणून बहुजनांच्या विकासाचे ध्येय सोबत बाळगून आपण काम करत आहोत व सदैव काम करत राहणार आहे.
त्यासाठी युवकांनी समोर यावं व पक्षाच्या या कार्याला धेय्यपूर्ती पर्यंत पोहचवण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला असे आव्हाहन केले.नंतर युवकांच्या तक्रारी त्यांच्याकडून जाणून घेतल्या व या सर्व तक्रारींच लवकरात लवकर निवारण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला सुमारे 600 ते 700 युवक व युवतींनी आपली उपस्थिती दर्शवली.