ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजासन जिल्हा परिषद शाळेला विवेक जॉन्सन यांची भेट

विद्यार्थ्यांची साधला संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी विजासन येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ व गटशिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती .मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या शुभहस्ते शाळेतील भौगोलिक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यावेळी केंद्रप्रमुख मोरेश्वर विघे, मुख्याध्यापिका पेंदाम, शिक्षक अमोल वहाडे,जीवने,चांदेकर,डोंगरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे जगन दानव,सुरज उमाटे,दीपक कावटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये