ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डेफोडील कान्वेंट मधे वार्षिक स्नेहस्मेलन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      परम्परा बहुउद्देशीय संस्थादवारे संचालित पाटिल नगर येथील डेफोडील कान्वेंट मधे नुकताच वार्षिक स्नेह- सम्मेलनाचा कार्यक्रम शुभप्रसंग हॉल मधे उत्साहात पार पड़ला.

      कार्यकमाचे अध्यक्ष श्री. के. एस. रावळे आणि उद्घाटक म्हणून माजी सैनिक दादाजी सोनटक्के होते. मुख्य अतिथि म्हणून श्री. बी. एम. दरेकर, निवृत्त प्रिंसिपल लोकमान्य विद्यालय हे होते तर श्री.सी. पी. आस्वले आणि श्री पी. आर. खापरडे हे सन्माननीय अतिथि होते. व्यासपिठावर प्राचार्या निशा पाटिल आणि उप प्राचार्या अश्विनी राव उपस्थित होत्या. डॉ. रोशन अलोने आणि सूजाता अलोने हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरातर्फे माता सरस्वती, जिजाऊ माता, रमाई आम्बेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दिप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर दादाजी सोनटक्के यानी रिबीन कापुन कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन केले. मान्यवरांचे स्वागत शॉल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. वार्षिक अहवाल वाचन प्राचार्या निशा पाटिल यांनी केले.

    कार्यक्रमाला सम्बोधित करताना श्री. दरेकर सर यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले तथा सोनटक्के यांनी सैनीकांचे जीवन आणि देशसाठी त्यांचे बलिदान याविषयी माहिती दिली आणि आवाहन केले की देशसेवेसाठी तत्पर राहणारी पीढ़ी निर्माण करने आवश्यक आहे. आपल्या अध्यक्षिय भाषनात के.एस.रावळे यांनी म्हटले की पालकांनी आपल्या पाल्याना शिक्षणासह चांगले संस्कार द्यावे.

    छोट्या छोट्या बालकानी लावणी नृत्य, आदिवासी नृत्य, पंजाबी नृत्य, देशभक्तिपर गीतावरिल नृत्य बहारदारपने सादर केले. विशेष आकर्षण राहिलेले “पाणि वाचवा “(सेव वॉटर) या प्रहसनाने श्रोत्यावर विशेष छाप सोडली आणि त्यांची मने जिंकली.

मुलांच्या आईनी सुद्धा सुंदर नृत्य प्रस्तुत केले. पालकांनी तसेच मान्यवरानी कार्यक्रमची प्रशंसा केली. अश्विनी राव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच शालिनी मालोदे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सीमा झाडे, प्रगति कपाट, योगिता कपाट आणि इतरानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये