ताज्या घडामोडी

रोटरी उत्सव हा चंद्रपुरकरांसाठी आनंदोत्सव – आमदार मुनगंटीवार 

रोटरी उत्सवाचे थाटात उद्घाटन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : रोटरी उत्सव चंद्रपूरकर जनतेसाठी आनंदाचा उत्सव आहे. रोटरी क्लबच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. एक वर्षापूर्वी याच दिवशी सुमारे ५०० वर्षांचा प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवान संपला आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली तो आजचाच दिवस. या ऐतिहासिक सुवर्ण घटनेला वर्षपूर्ण होत आहे.त्यामुळेही आज रोटरी उत्सवाचे उद्घाटन करताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बल्लारपुरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित पाच दिवसीय रोटरी उत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर रोटरीचे माजी प्रांतपाल महेश मोखलकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवर, रवींद्र जैन, बुक्कावार, सचिव मिलिंद बोडखे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार मुनगंटीवार यांनी आकाशात रंगबिरंगी फुगे सोडून रोटरी उत्सवाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना मुनगंटीवार यांनी सतरा वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या कार्याचे तसेच रोटरी उत्सवच्या आयोजकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच या आनंद उत्सवाचे स्वरूप भविष्यात अधिक मोठे व्हावे असेही ते म्हणाले. यावेळी महेश मोखलकर यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ.विजय आईंचवार यांनी रोटरी उत्सवाची सुरूवात कशा पध्दतीने झाली व यातून नवउद्योजकांना कशा प्रकारे स्वत: निर्मित वस्तुंचे मार्केटींग करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला हे सांगितले.

रोटरीचे अध्यक्ष अजय पालारपवार यांनी रोटरी शैक्षणिक व सामाजिक कार्यासोबतच गरीब व अनाथ मुलांसाठी सपने सच हये हा उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. संचालन राजश्री मार्केडेवार व मुस्कान पिंजारी यांनी केले तर आभार मिलिंद बोडखे यांनी मानले. यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी उत्सवातील स्टॉलला भेटी देवून स्टॉलधारकांशी संवाद साधला तसेच त्यांचे कौतूकही केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये