ताज्या घडामोडी

योगाला जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका स्मिता जिवतोडे ह्यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य चांदा पब्लिक स्कूल येथे योग दिवस साजरा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य चांदा पब्लिक स्कूल येथे योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या संचालिका स्मिता संजय जिवतोडे, मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणे म्हणजे योग आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे. योग हा एक सर्वांगीण अभ्यास आहे. योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखल्या जाते. ज्यामुळे लक्ष केंद्रीत करणे, एकाग्रता व सकारात्मकतेचा विकास साधल्या जातो त्यामुळे योगाला जीवनाचा अविभाज्य घटक बनवा असे आवाहन संस्थेच्या संचालिका स्मिता जीवतोडे ह्यांनी उपस्थितांसह विद्यार्थ्याना केले.

योगा गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थित सर्वांनी विविध योगासने, सुर्यनमस्कार, मेडिटेशन, श्वसनाचे विविध व्यायाम, हास्य व्यायाम अशा योगसाधना करून योग दिवस साजरा केला. योग दिवसाच्या निमित्याने विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान योगासने व त्यांचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली.

“योगा ही भारतातील प्राचीन विद्या आहे. आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्याने ही विद्या संपूर्ण जगाने आत्मसात केली आहे. खऱ्या अर्थाने निरोगी जीवनशैलीकरीता योगविद्येचा उपयोग होतो“ असे मत प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी व्यक्त केले.
आंतराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व शिक्षिका ज्योती बिलोरीया यांनी उपस्थित सर्वांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूहीना तबस्सुम यांनी केले तर आभार प्रदर्शन जास्मीन हकीम यांनी केले. कार्यक्रम प्रमुख प्रांजली गोवारदिपे तसेच क्रीडा शिक्षक अमर कडपेवाले, विनोद निखाडे, रमेश कोडारी, जयंती मड्डेला, प्रनोती चौधरी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये