ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झोपेतच आयुध निर्माणी कर्मचाऱ्याचा मृत्यू : परिसरात हळहळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत राहणारे आयुध निर्माणी कर्मचारी अनंता कनृजी कुमरे (वय ५२) यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आयुध निर्माणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंता कुमरे हे भद्रावती येथील आयुध निर्माणीमध्ये कर्मचारी पदावर कार्यरत होते. दिनांक १५ रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते झोपले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे उशिरापर्यंत ते उठले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली.

यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये