शरदराव पवार महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 विषयावर कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्कूल कनेक्ट 2.0 या विषयावर 9 वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या दिशा निर्देशानुसार शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय व महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, प्रशिक्षक डॉ. शरद बेलोरकर, समन्वयक प्रा. पवन चटारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुरपाम,प्रा. डॉ. बोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, डॉ. संजय गोरे, प्रशिक्षक डॉ. शरद बेलोरकर यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ठळक वैशिष्ट्ये व विविध पैलू समजावून सांगण्यात आले तसेच अभ्यासक्रमामध्ये कौशल्यावर आधारित असलेला अभ्यासक्रम ,आंतरिक गुणवत्ता ,क्रेडिट सिस्टीम, विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना याबद्दलची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. पवन चटारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. मंगेश करंबे यांनी मानले सदर कार्य शाळा यशस्वी होण्यासाठी शरदराव पवार महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.