Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लाजाळू स्वभावामुळे महिला आपला आजार लपवून ठेवतात : डॉ. साळुंके

संत श्री संताजी सेवा मंडळाच्या पुढाकार ; कर्करोग निदान तपासणी शिबिर आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

आरोग्यविषयक समस्यांचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना अधिक असतो. आपल्या लाजाळू स्वभाव व भीतीमुळे अनेकदा महिला आपल्या आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत. आपल्या आजारांविषयी माहिती देत नाहीत. त्या डॉक्टरकडे जाणे टाळतात. कुटुंबातील ईतर सदस्यांची काळजी करता – करता त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. भविष्यातील धोका टाळायचे असतील तर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टाटा कॅन्सर हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज साळुंके यांनी केले. ते संत श्री संताजी सेवा मंडळाच्या महिला मंडळ वतीने शनिवार ( दि.१८ जानेवारी) आयोजित रोजी हळदी कुंकू कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, हल्ली महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तनाचे आजार वाढले आहे. त्याला वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण आपले भावी आयुष्य निरोगी ठेऊ शकतो. असे डॉ. साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी मंचावर डॉ. ट्विंकल ढेंगले मुख रोग तज्ञ, नताशा देवघरे, काजल विश्वास, सौ.गीता सिस्टर, बबिता सिस्टर यांच्यासह संत श्री संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.मंगेश बेले, महिला अध्यक्षा प्रा. डॉ. भाग्यश्री गवते (रागीट) मॅडम, युवती अध्यक्षा मोनाली शेंडे, युवक अध्यक्ष मोहित ईटनकर, किसनराव लोहबळे यांची उपस्थिती होती.

यावेळी महिलांसाठी तीळ गुळ पासून बनविलेले साहित्य तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विजयी स्पर्धकांना बक्षीस व उपस्थित महिलांना वाणाची भेट देण्यात आली. कार्यक्रमा मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

कर्करोग निदान तपासणी शिबिर मध्ये महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. प्रास्ताविक भाषण महिला अध्यक्षा प्रा.डॉ. भाग्यश्री गवते (रागीट) यांनी केले. संचालन श्रीमती.स्वाती बाभूळकर आणि अर्चना बुटले यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर घुबडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण प्रा. प्रतिक पहेलवार आणि माजी नगर सेविका रेणुका दुधे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.राजेशजी खनके, सुधाकरराव घुबडे, मोहनराव कळंबे, अनिलराव ढोक, चंद्रशेखर लीचोडे, ज्ञानेश्वर कामडी, अँड.बंडूजी खनके, मधूकर शेंडे, जयंतराव सुरकर, विजयराव बाबुलकर, पलाश कवलकर, मोनीश खनके, मनोज बेले, अवीकांत नरड, प्रदीप लोखंडे, दिनेश लीचोडे, राहुल कळंबे यांच्यासह युवती मंडळाच्या कु. मोनाली शेंडे, कु. पूजा लोहबडे, कु. समृध्दी शेंडे, कु. कल्याणी पोहाणे महिला मंडळाच्या श्रीमती स्वाती बाभूलकर, श्रीमती पुष्पा गिरडकर, सौ. वैष्णवी जुमडे, मनीषा कोपरकर, श्रीमती अर्चना बुटले, स्वाती डफ, प्रिती खनके, नेहा सातपुते, सौ. स्मिता कवलकर यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये