Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात “रस्ता सुरक्षा अभियान” कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग , राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 18 जानेवारीला “रस्ता सुरक्षा अभियाना च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णां धोटे तर प्रमुख मार्गदर्शक श्री. विष्णू कुंभलकर, आर.टी.ओ. इन्स्पेक्टर तसेच अमानुल अन्सारी, आर.टी.ओ. इन्स्पेक्टर व डॉ कुंदन शहारे उपस्थित होते.

या कार्यशाळेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने झाली. याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकेतून प्राध्यापक डॉक्टर कुंदन शहारे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यशाळेच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला.

     तसेच कार्यक्रमाचे मुख्य वक्ते विष्णू कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व रस्ते नियम पाळायला पाहिजेत त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अपर्णा धोटे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना प्रत्येकाने रस्त्याचे नियम पाळले पाहिजे, अति वेगाने वाहन चालवू नये आणि सामाजिक वाहन चालण्याविषयीची जागृती वाढवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले.

       कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे तर आभार प्रदर्शन डॉक्टर शशिकांत सित्रे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये