Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध रेती वाहतुक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने केला जप्त

पिर्ली नियतक्षेत्रातील कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       वनपरिक्षेत्रातील पिर्ली नियतक्षेत्रा अंतर्गत कक्ष क्र.९०७ मध्ये अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने टाकलेल्या धाडीत रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ही कारवाई दि.१६ जानेवारीला रात्रौ ९ वाजताच्या सुमारास केली.

     विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के.डब्ल्यु.धानकुटे यांचे नेतृत्वात क्षेत्रीय वन कर्मचारी यांनी संरक्षित वनाकडे गेले असता त्यांनी अजराज दातारकर रा. वाघेडा (सेलोटी) यांच्या मालकीचे महिंद्रा ट्रॅक्टर क्र.एमएच.३४-बीआर-९५२० व ट्रॉली द्वारा शासकीय वनातील संरक्षीत वन कक्ष क्र.९०७ मधील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.वाहन चालकाला रेती वाहतुकीचा परवाना मागविला त्याचे कडे आढळून आला नाही. तेव्हा वनअधिकारी यांनी ट्रॅक्टर मालक व चालक अजराज दातारकर याचेवर कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

  या कारवाईत क्षेत्र सहाय्यक एन.बी.शेळकी मासळ,विकास शिंदे भद्रावती, वनरक्षक एम.आर देठे,डी. एम.गेडाम, पवन मांढरे,नितिन राऊत,अनिल शेंद्रे,अमर किन्नाके, महादेव मडावी,किशोर मडावी, अमरदिप कोल्हे यांनी ही मोहीम यशस्वी राबविली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये