ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वांढरी फाटा मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा – सुश्मित गौरकार

अन्यथा युवासेना तर्फे तीव्र आंदोलन करु असा इशारा

चांदा ब्लास्ट

   दि. ३१/१०/२०२३ ला शिवसेना जिल्हप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांच्या पत्राद्वारे जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.

 वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन कन्स्ट्रक्शन,ग्रेस व इतर कंपनीची अवजड वाहतूक होऊन राहली त्या अवजड वाहतूकीमुळे गावामधे धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्या धुळीमुळे आणि ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा मार्ग गावातील मुख्य मार्ग असल्यामुळे गावातील शाळाकरी विद्यार्थी शेतकरी गावकरी यांचा जाण्या येण्याचा रहदारी चा मार्ग आहे जड वाहतुकी साठी दुसरा पर्यायी मार्ग असून सुद्धा कि. मी. अंतर वाचवून डीझेल वाचविण्यासाठी गजानन कन्स्ट्रक्शन,ग्रेस व इतर कंपन्या ही जड वाहतूक शॉर्टकट वांढरी गाव ते वांढरी फाटा ह्या मार्गाने येणे जाणे करत आहे भविष्यात या अवजड वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    म्हणून हे सर्व बाब लक्षात घेऊन ही अवजड वाहतूक ८ दिवसात बंद करण्यात यावी

अन्यथा युवासेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार यात आणखी काही नुकसान झाल्यास सर्वस्व प्रशासन जिम्मेदार राहणार  असा इशारा देण्यात आला यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे,केतन शेरकी,तुषार शेडामे,आकाश पावडे,चेतन कामडी, महेश जुनारकर,आयुष गौरकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये