Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या गावठी मोहा दारू विक्री

संपूर्ण मुद्देमाल जप्त ; हिंगणघाट डी बी पथकाची कारवाई !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा – हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा प्रविण तल्लार हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैदयरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून वना नदी चे पुला वरून नांदगाव चौक हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने नांदगाव चौक हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे मोपेड वाहन क्रमांक MH 32 AA 4756 गाडी गावठी मोहा दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास पोस्टाफचे मदतीने नाकाबंदी करून थांबविण्याचा इशारा केला.

चालकाने त्याचे ताब्यातील वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.त्याने त्याचे नाव गाव प्रविण राजाभाऊ तल्लार वय 41 वर्ष रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिगणघाट सांगितले.पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदान मध्ये ठेवून असलेल्या चुगडी मध्ये चार मोठ्या प्ल्यास्टिक पन्नीमध्ये 20 लिटर प्रमाणे एकूण 80 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 150 रु. प्रमाणे 12,000 रु. जुनी वापरती हिरो कंपनीची मेस्ट्रो पांढऱ्या रंगाची मोपेड वाहन जिचा नोंदणी क्र MH 32 AA 4756 किंमत 70,000 रु. असा एकून 82,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. व मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. उपनी. भारत वर्मा सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पो.शी. अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये