देऊळगाव राजा तालुक्यांतील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र शासन राज्यात विविध उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून गतिमान प्रशासन करण्याकरता ई गव्हर्नर्स अंतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर्स शासनातर्फे उपलब्ध झाले असून दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी देऊळगावराजा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळाधिकारी यांना देऊळगावराजा तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार मनोजजी कायंदे यांच्या शुभहस्ते लॅपटॉप व प्रिंटर चे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगाव राजा ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोषजी खांडेभराड, प्रदीप वाघ, नितीन कायदे गजानन काकड हे व सर्व कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी सर्व तलाठी व सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते यावेळी माननीय आमदार महोदयांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना जनतेला प्रशासनातर्फे तात्काळ व चांगली सेवा प्रशासनाकडून मिळावी याबाबत मनोगत व्यक्त केले. शेवटी मंडळाधिकारी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.