ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोरपना अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेचे अर्ज संबंधित ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. दिनांक २३ जून ते ७ जुलै २०२३ या कालावधीत अर्जांची स्वीकृती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय कोरपना येथे करण्यात येत आहे. तालुक्यातील परसोडा, परसोडागुडा, जेवरा, अकोला, चनई बु, कन्हाळगाव येथे अंगणवाडी क्र दोन, जांभूळधरा, माथा येथे अंगणवाडी क्र एक, हेटी, नारडा येथे अंगणवाडी क्र दोन, कढोली खू येथे अंगणवाडी क्र एक, कवठाला येथे अंगणवाडी क्रमांक एक व दोन, बाखडी येथे अंगणवाडी क्र एक, उपरवाही येथे अंगणवाडी क्र तीन, कोराडी, अंतरगाव येथे अंगणवाडी क्र दोन, एकोडी, खैरगाव, इरई, भारोसा, वणोजा, बोरगाव खुर्द येथील अंगणवाडीची अंगणवाडी मदतनीसची अशी एकूण २३ पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती करता कोरपनाचे एकात्मिक विकास बाल विकास योजना प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांचेशी संपर्क साधण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये