Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन टावर बॅटरी चोरी करणारी टोळी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिनाक 13/01/2025 रोजी फीर्यादी नामे विवेक चंद्रशेखर गांजरे रा. कन्नमवारग्राम ता. कारंजा जि. वर्धा ह. मु संदीप पंतरगे याचे घरी किरायाणे स्टेªट बॅक कॉलनी वर्धा यांनी राजकला टॉकीज रोडवरील कमरशीअल कॉम्पलेक्स वर असलेल्या वोडाफोन कंम्पनीच्या टावरच्या एकुण 24 बॅट-या चोरी गेल्या याबाबत दिलेल्या तक्रारी वरून पो.स्टे. वर्धा (शहर) अप क्रमांक 0063/2025 कलम 303 (2) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा द्वारे सुरू असतांना सदर गुन्हया सबंधाने पेट्रोंलीग करीत असता गोपनिय माहितीचे आधारे आर्वी नाका वडर झोपडपटटी येथे राहणा-या महिला आरोपी नामे 1) श्रीमती अनिता दशरथ जाधव वय 30 वर्ष 2) श्रीमती लक्ष्मी सुरेश मुंदेवार वय 36 वर्ष 3) शोभा सुरेश सातपुते वय 30 वर्ष 4) जोत्सना दादाराव मुळे वय 28 वर्ष 5) कमला सुनिल मुळे वय 40 वर्ष सर्व रा. आर्वी नाका वडर झोपडपट्टी वर्धा अशा महिला आरोपी यांना ताब्यात घेवुन सदर गुन्हयात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न करून त्यांना गुन्हया बाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने व सदर चोरीच्या बॅट-या भंगार दुकानादार नामे 1) तहसिन शेख अब्दुल खालीक शेख वय 32 वर्ष रा. यशवंत आर्ट कॉलेज मागे लक्ष्मी नगर वर्धा 2) फिरोज खान समशेर खान पठाण वय 36 वर्ष रा. महादेवपुरा वर्धा 3) शेख नबि शेख मेहबुब वय 52 वर्ष रा. साई नगर म्हसाळा वर्धा यांना विकल्याचे सांगीतले वरून सदर भंगार दुकानदार याचे ताब्यातुन 12 बॅट-या व 5 बॅटरीचे तुटलेले तुकडे असा एकुण जुमला किंमत 92,336/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हे पुढीत तपास कामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) याचे ताब्यात देण्यात आले आहे.

        सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे साहेब यांचे निर्देशानुसार मा. पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोउपनी राहुल इटेकार, पोलीस अंमलदार गिरीश कोरडे, सचिन इंगोले, शेखर डोंगरे, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, अरविंद इंगोले, रितेश गेटमे व महिला अंमलदार पल्लवी बोबडे सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यानी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये