Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

फेरीलँड विद्यालयात आनंद मेळ्याअंतर्गत फुड फेस्टिवलचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती येथील फेरीलैंड विद्यालयात आनंद मेळ्याअंतर्गत फुड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले.विस वर्षांची परंपरा लाभलेल्या या आनंद मेळ्यातील फुड फेस्टिवल मधे विद्यार्थ्यांनी व पालकांनी ऊत्स्फुर्तपणे भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या ऊपक्रमाचे कौतुक केले.सदर फेस्टिवल चे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष अड.युवराज धानोरकर यांनी केले.

यावेळी सचीव व प्राचार्य वर्षा धानोरकर, उपप्राचार्य अर्चना धोटे, व्यवस्थापक कुमुद पोईनकर, दानीश शेख,सागर मामीडवार आदी मान्यवर ऊपस्थीत होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय अवांतर विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी सदर ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी विवीध खाद्यपदार्थांचे स्टाल लावले.या खाद्यपदार्थांचा ऊपस्थितांनी आस्वाद घेतला.उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये