Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

छत्रपती अर्बन पतसंस्थेत राष्ट्रमाता माँ जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

माँ जिजाऊंनी शौर्य आणि धैर्य सुसंस्कृताचे धडे दिले - सभापती समाधान शिंगणे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयातचं शौर्य व धैर्य त्याचबरोबर सुसंस्कृताचे धडे दिले त्यांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन छत्रपती अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या 427 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माँ जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद प्रतिमेला हार अर्पण करून पुष्प पूजन करण्यात आले.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी संस्थेचे संचालक माजी सरपंच सुभाष शिंगणे,सुनिल मोरे,सुभाष इंगळे,रामा म्हस्के, मन्नान पठाण,गजानन पाटील,प्रसिद्ध व्यापारी अजय कोटेचा, केमिस्ट्री संघटनेचे अध्यक्ष राम प-हाड,पत्रकार संतोष जाधव, संपादक आदिल पठाण,मो.इरफान, रवी मुळे, अशोक पाबळे,अमोल बोबडे,विशाल उबरहंडे, भगवान चंद, व्यवस्थापक पुरषोत्तम शिंगणे, नितीन खिल्लारे, संतोष चेके,रविंद्र पन्नासे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये