Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे

यासाठी "महसूल अभियान" राबविण्याबबत, फेरफार अदालत घ्यावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी “महसुल अभियान” राबविण्याबाबत नुसार कार्यवाही करणेबाबत निर्देशीत केलेले आहे.

त्याअनुषंगाने १५ दिवसांचे वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरीता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. संदर्भीय परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. सदर परिपत्रकातील परीच्छेद नुसार आपले तालुकयातील प्रत्येक मंडळावर प्रत्येक आठवडयात चक्राकार पध्दतीने दिनांक ०१.०१.२०२५ पासून दर शुक्रवारी शिबीराचे आयोजन करून खालील नमुद विषयाबाबत प्रभावीपणे अमलबजावणी करण्यबाबत निर्देशित केलेले आहे.

१. १५ दिवसाच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे व विवादग्रस्त फेरफार सुनावणी घेवून निकाली काढणे

२. भुसंपादन केलेल्या व अकृषक परवानगी दिलेलया प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दफतर अदयावत करणे.

३. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, पांचन, शेतरस्ते, शिवाररस्ते, मार्ग मोकळे करणे.

५ . ४. गाव तिथे स्मशानभूमी / दफनभूमी सुविधा उपल्बध करून देण्०.

५. शैक्षिणक प्रयोजनासाठीचे दाखले व नागरिकांना द्यावयाच्या सोयी सुविधा व विविध दाखले तालुका, मंडळ स्तरावर गावपातळीवर विशेष शिबीर घेवून प्रदान करणे

६. ई पीक पाहणी तसेच ई चावडी प्रकल्पाची अमलबजावणी करणे.

७. शेतकरी खातेदारांच्या शेतजमिनी, खातेफोड, पोटविभाजन, अर्ज सिवकारून त्वरित निकाली काढणे

८. न्यायालयीन प्रकरणे निकाली काढणे

९. शासनाच्या विविध योजनांचा गावपातळीवर आढावा घेणे.

करीता सदर प्रमाणे वरीष्ठ कार्यालयास सादर करवयाची माहिती अचुक सादर करता यावी या करीता

आपल्याशी संबंधित विषयावरील (आपले मंडळातील) माहिती न चुकता या कार्यालयास सादर करावी.

वर्धा जिल्ह्याचे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम तसेच अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा तहसील चे तहसीलदार संदीप पुंडेकर, तसेच नायब तहसीलदार संदीप डाबेराव, अजय धर्माधिकारी मंडळ अधिकारी सेवाग्राम कुमार बारसागडे तसेच सेवाग्राम मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये