ताज्या घडामोडी

मला पार्सल म्हणणाऱ्यांना जनतेनेच दिली चपराक – आ. देवराव भोंगळे

भुरकुंडा (बु.) वासियांनी केला आ. देवराव भोंगळे ह्यांचा सपत्नीक नागरी सत्कार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे ह्यांचा तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या भुरकुंडा (बु.) येथील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सपत्नीक नागरी सत्काराचे आयोजन दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी केले होते. विधानसभा निवडणुकीत देवराव भोंगळे ह्यांच्या विजयात मोलाची आघाडी देणाऱ्या भुरकुंडा येथिल मतदारांनी गावातून आमदार भोंगळे ह्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून निवडणुकीतील उत्साह अजुनही कायम असल्याचे दाखवून दिले.

आमदारांच्या सपत्नीक नागरी सत्काराच्या कार्यक्रमाची सुरुवात गावातील मिरवणुकीने झाली. सत्कार स्थळी पोहचल्यावर मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मंचावर स्थानापन्न झाल्यानंतर विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षस्थान माजी सरपंच अनिल वेगिनवार ह्यांनी भूषविले तर मंचावर विशेष अतिथी म्हणुन व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंग चे जिल्हाध्यक्ष आशिष रैच, देवाडा ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मडावी, भाजयुमो तालुका अध्यक्ष अजय राठोड, ग्राम पंचायत सदस्य इंदिरा लोहबडे, विरूर स्टे. येथिल जेष्ठ भाजपा नेते सतिश कोमरपल्लीवार, रविंद्र कुकडे, सुधाकर रैच, श्रीकांत भाकरे, शिवकरण खदाव, रमेश जोशी उपस्थित होते.

भुरकुंडा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार देवराव भोंगळे ह्यांना शाल श्रीफळ देऊन तर त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी अर्चना भोंगळे ह्यांची खणा नारळाने ओटी भरण्यात आली व भलामोठा पुष्पहार घालुन आमदारांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. ह्यावेळी आमदार भोंगळे ह्यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य असलेले शंकर पुसाम व  गंगाबाई पुसाम यांचेसह अक्षय आदे तसेच प्रदिप मादासवार ह्या युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला.

नागरी सत्काराला उत्तर देताना आमदार देवराव भोंगळे ह्यांनी आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या तसेच मत रुपी आशिर्वाद देऊन विधानसभेत पाठविल्याबद्दल क्षेत्राच्या जनतेचे व त्यातही भुरकुंडा येथिल जनतेचे आभार मानले व माताभगिनिंनी टाकलेल्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही देतानाच ग्राम वासियांना कुठल्याही समस्येबाबत अवगत करून दिल्यास त्याचे निराकरण प्राधान्याने करणार असल्याचे सांगतानाच त्यासाठी आपण केव्हाही फोन करावा असेही सांगितले.

आपल्या विजयाच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की ह्या विजयात भुरकुंडा येथील मतदारांचा सिंहाचा वाटा असुन केवळ विरोधकांनीच नव्हे तर स्वपक्षीयांनी देखिल निर्माण केलेल्या आव्हानाचा सामना करण्याची शक्ती व जिद्द भाजपा कार्यकर्त्यांची असलेली भक्कम साथ व त्यांचा विश्र्वास सर्वाधिक महत्वाचा होता. पुर्वापार काँग्रेस व त्यांनतर शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या ह्या ग्रामपंचायतीने आपल्याला मताधिक्य दिले ह्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

आपल्याला उमेदवारी जाहीर होताच शिस्तबद्ध पक्ष अशी ख्याती असलेल्या आपल्याच पक्षातील दोन माजी आमदार तसेच काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या विरोधात आघाडी उघडली, पत्रकार परिषद घेऊन पक्ष शिस्तीचा भंग केला व आपल्याला पार्सल उमेदवार संबोधुन पक्षाच्या निर्णयाचा अवमान केला मात्र राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने आपल्याला भक्कम साथ दिली. ह्या क्षेत्रात मागील दीड वर्षात केलेल्या जनसेवेच्या कार्याची जनतेने प्रामाणिकपणे दखल घेतली. आपल्या जन संपर्काचे चीज आपल्या मतदानाने झाले असुन ह्या माध्यमातून जनतेनेच आपल्याला पार्सल उमेदवार म्हणणाऱ्या त्या नेत्यांना जोरदार चपराक दिली असल्याचेही आमदार देवराव भोंगळे ह्यांनी नमुद केले.

नागरी सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक भाजपा नेते विक्रम नागोसे ह्यांनी तर खुमासदार संचालन शरद बोबडे ह्यांनी केले. याप्रसंगी भुरकुंडा भाजपा अध्यक्ष मारोती शेंडे, अशोक सूर्तेकर, बालाजी निकोडे, प्रल्लाद लोहबडे, भिकाजी वाडगुरे, रमेश आदे, तुकाराम कोटरंगे ह्यांनी विशेष प्रयत्नपूर्वक आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला रमेश कोडागुर्ले, प्रविण नळे, तुकाराम ढुमने, रमेश कोटरंगे, देवराव जुमनाके, श्रावण आदे, मालुदेव कोडेकर, भास्कर वाड्गुरे, मनोज चांदेकर, डिकेश्वर भेसेकर, गणपत बावने, अशोक झाडे, पुंडलीक सुर्तेकर, सुधाकर रामगीरवार, मारोती लेडगुरे, संजय रामगीरवार, मारोती मोहूर्ले, हर्षल कोटरंगे, गौरव सुर्तेकर, साईनाथ सुर्तेकर, गणेश ढोले, आनंद आदे, गणेश वाडगुरे, अंकीत कोटरंगे यांचेसह महिला आघाडीच्या तिरुपला आदे, इंदूलाई ढुमने, माधुरी निकोडे, सुवर्णा निकोडे, इंदिरा आदे, माया शेंडे, रतिका वाड्गुरे, आशा मोडूले, इंदू कोटरंगे, मंगला नागोसे, मिराबाई नागोसे, गंगुबाई वाडगुरे, कलावती रामगीरवार, मंगला सुर्तेकर यांचेसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये