Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सुधाकर बांदूरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : माजी उपसरपंच ग्रा.पं. घुग्घुस व धनोजे कुणबी समाज संघटनेचे घुग्घुस शहराध्यक्ष सुधाकर गणपतराव बांदूरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन बांदूरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बाळू धानोरकर हे धनोज कुणबी समाजाचे स्वाभिमानी व्यक्तिमत्व मानले जात होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. मात्र, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर बांदूरकर यांना पक्षात काम करण्याची इच्छा नव्हती.

 तसेच, आपल्या वैयक्तिक कामाचा दाखला देत त्यांनी आज, गुरुवार, दिनांक 09.01.2025 रोजी काँग्रेस घुग्घुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये