Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कंटेनर दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वार व कंटेनर यांनी एकमेकांना समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी-नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील माहेर फाट्यावर आज दि. ८ जानेवारी रोजी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये मृत झालेल्या युवकाचे नाव गणेश मन्साराम तुपट वय २६ वर्ष रा. उदापुर तह. ब्रम्हपूरी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील उदापूर येथील गणेश तुपट हा आपल्या एम.एच. ३४ बीसी ८४२९ या क्रमांकाच्या दुचाकीने ब्रम्हपूरी वरून नागभीड कडे जात होता. तर नागभीड कडुन ब्रम्हपूरी कडे एम.एच.३१ एफ.सी.३७२९ या क्रमांकाचा कंटेनर येत होता. तेव्हा ब्रम्हपूरी नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील माहेर फाट्यावर कंटेनर व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भिषण होती की दुचाकी चकनाचुर होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम, प्रमोद सावसाकडे, राहुल लाखे, उमेश बोरकर यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आरोपी चालक याच्या विरुद्ध कलम २८१,१०६(१),१८४ गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये