Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पत्रकार राठोड वरील हल्ल्याचा पत्रकार संघने केला निषेध

पत्रकार विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पत्रकार दिनी बुलढाणा येथील पत्रकार प्रेमकुमार राठोड यांच्या वर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या विरुद्ध पत्रकार हल्ला विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवा अशी मागणी देऊळगाव राजा येथील तिन्ही पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

 बुलढाणा येथील संपादक प्रेम कुमार राठोड यांच्यावर पत्रकार दिनी झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले वाढत आहे. शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा केला मात्र त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या तीव्रतेने करीत नसल्याचा आरोप देऊळगाव राजा येथील पत्रकारांनी केला आहे.

सदर हल्ल्याचा निषेध नोंदवित पत्रकार राठोड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध पत्रकार हल्ला विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार मुशिरखान कोटकर, गजानन तिडके, सुरज गुप्ता सुषमाताई राऊत, प्रा.अशोक डोईफोडे, प्रदिप हिवाळे, मोहम्मद जमील  ‘अमोल बोबडे, अशरफ पटेल, किरण वाघ, पूजा कायंदे, प्रशांत पंडीत, संतोष जाधव,अर्जुनकुमार आंधळे, सन्मती जैन, अशोक जोशी, शिवाजी वाघ, चंद्रभान झिने मुबारक शहा, मंगेश तिडके, आदि पत्रकार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये