Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त भव्य पोलीस प्रदर्शनीस उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांना व नागरीकांना दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती व्हावी याकरीता पोलीस मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा येथे भव्य पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक ०६.०१.२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. मा. आमदार श्री. राजेश बकाने, देवळी पुलगाव मतदार संघ, वर्धा, मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, सहा, पोलीस अधीक्षक / उप विभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. राहुल चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री, प्रमोद मकेश्वर, उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडीत, परीवेक्षाधिन पोलीस उप अधीक्षक श्रीमती प्रतिक्षा खेतमाळीस, नगर परीषद वर्धा मुख्याधिकारी श्री. राजेश भगत, इवोनिध स्टिल प्लांट भुगाव येथील जनरल मॅनेजर श्री. रमाकांत शर्मा यांचे उपस्थितीत सदर पोलीस प्रदर्शनीचे उद्घाटन करुन उपस्थित विद्यार्थी व नागरीकांसोबत मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांनी सुसंवाद साधुन मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री. राजेश बकाने देवळी/पुलगाव विधानसभा मतदार संघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दि. ०६.०१.२०२५ रोजी सदर प्रदर्शनीमध्ये संपुर्ण वर्धा जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालय येथुन हजारो विद्यार्थी व नागरीकांकडुन सहभाग घेण्यात आला असुन विद्यार्थ्यांना व नागरीकांना दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती व्हावी याकरीता सायबर जनजागृती व साक्षरता, वाहतून नियमन व रस्ते सुरक्षा, शस्त्र प्रदर्शनी, मॉडेल पोलीस स्टेशन, चॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड, बिनतारी संदेश वहन, महिला सुरक्षा, डायल ११२, चाईल्ड हेल्प लाईन १०९८, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, फॉरन्सीक व्हॅन व टुल किट्स, QRT & RCP, गृहरक्षक दल, इत्यादी स्टॉल लावुन त्यांचे कर्तव्य व कामाबाबत माहिती देण्यात आली.

आपतकालीन परस्थितीमध्ये (दंगा काबु करणे, बॉम्ब डिस्पोज करणे, पोलीस बॉनचे काम, व्हि.आय.पी. बंदोबस्त) यामध्ये पोलीसांची भुमीका काय असते याबाबत विद्यार्थ्यांना व नागरीकांना प्रात्यक्षीक देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकरीता प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सदरची प्रदर्शनी दि. ०६ जानेवारी व ०७ जानेवारी २०२५ असे दोन दिवस आयोजीत असुन वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरीकांनी दि. ०७ जानेवारी २०२५ रोजी जास्तीत जास्त संख्येने पोलीस प्रदर्शनीमध्ये सहभाग घेवुन पोलीसांचे कामकाजाची माहीती प्राप्त करुन घेवुन प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये