राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राज्यभर राबविणार – नामदार चंद्रशेखर बावनकुळे
शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रधानमंत्री यांचा जन्म दिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस 2 ऑक्टोंबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हे अभियान आता राज्यभर राबवून तळागाळातील गरीब सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांसोबतच विविध प्रमाणपत्राचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यात येईल यामुळे नागरिकांना वेळोवेळी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही, असे मनोगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरीर सोष्ठव स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी केले.
जिल्हा क्रिडा संकल येथे युवा एकता क्रिडा मंडळाच्यावतीने नामदार डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त आयेाजित शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृहनिर्माण, गृह, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, बडनेराचे आमदार रवी राणा, माजी खासदार रामदास तडस, मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत बुर्ले, अजय मोहिते आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्याला विकसित जिल्हा म्हणुन नावारुप आनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून राज्य शासन राबवित असलेल्या प्रत्येक योजना पुढे चालू ठेवून कोणत्याही योजना बंद करण्यात येणार आहे. शेतक-यांना सिंचनासाठी 12 तास वीज अंखड वीज देण्यासोबतच पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येईल असे पुढे बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शरीर सौष्ठवासाठी अविरत व्यायामाची आवश्यकता असल्यामुळे आजची तरुण पिढी व्यसनाधीन न होता व्यायामाकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याने तरुण पिढीला आपले आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होत आहे. यासाठी अशा शरीर सोष्ठव स्पर्धांच्या आयोजनाची आवश्यक आहे. पुढील वर्षी विदर्भ स्तरीय स्पर्धा घेण्यात येईल डॉ. पंकज भोयर म्हणाले.
यावेळी रवी राणा, रामदास तडस, देवदत्त नागे यांनी आपले मनोगत व्यक्त् केले. स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरलेला सौरभ नारायण वर्टी, बेस्ट पोझर पंकज गजानन ढाकुळकर, बेस्ट मस्कुलर अमर ठाकरे तसेच प्रत्येक गटात पाच पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश वसू, डॉ.मदन इंगळे, अजय वरटकर, निलेश कीटे, निशुभाऊ हरबुडे, डॉ. शशांक निकम, आशिष काळमेघ, गोलू जगताप, नौशाद शाह, सदीप.मडावी, अमोल चाहांदे, जितेंद्र डबले, रवि काकडे तसेच फिटनेस अरेना जिम चे सगळे सहका-या सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ॲङ इब्राहिम ब्रक्श यांनी केले.