Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

घुग्घुस येथे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपुर) : श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे २८ डिसेंबर रोजी जुन्या बसस्थानकाजवळील बांगडे प्रतिष्ठान येथे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने मानवतेची शिकवण देणाऱ्या संतांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.

 कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.

 यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बांगडे, उपाध्यक्षा वैष्णवी बोंमले, कोषाध्यक्ष शैलेश बांगडे, सचिव अनिल नित, सहसचिव प्रकाश सुरकार, सल्लागार हेमराज बोंमले, संतोष ढेंगळे, निलेश लांजेवार, अनघा नित, यामिनी सुरकार, पौर्णिमा लांजेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजातील अनेक बांधवांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला व आपली श्रद्धा व्यक्त केली.

 कार्यक्रमाने संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या शिकवणींच्या प्रसाराचा संदेश दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये