Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      थोर समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

      याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रूपचंद धारणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला बोंडे, प्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे आणि ज्येष्ठ शिक्षक रमेश आसेकर प्रभृती मंचावर उपस्थित होते.

      सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या उर्मिला बोंडे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेऊन सावित्रीबाईंचे शैक्षणिक योगदान,सामाजिक क्रांतीतील महत्व पटवून त्यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता स्पष्ट केली. यावेळी प्राचार्य सचिन सरपटवार यांच्या हस्ते उर्मिला बोंडे यांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कु.तनुश्री क्षीरसागर या विद्यार्थ्यिनीने केले, तर आभार कु.उर्वशी कष्टी या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये