Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राजगिरी बुद्ध विहारात सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     नवयुवक बौद्ध समाज सुधारक मंडळ आणि तक्षशिला जागृती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुकूम येथील राजगिरी बुद्ध विहारात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. धम्मवंदना झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवाजी मेश्राम होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , ज्योतीताई सहारे, धम्ममित्र नामदेव गेडकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित अतिथींनी सावित्रीबाईंच्या ऐतिहासिक कार्यासंबंधी मौलिक विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक गणवीर यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिता रायपुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नवयुवक बौद्ध समाज सुधारक मंडळाचे भाऊराव सागोरे, राजेश वाकडे, दशरथ चांदेकर तसेच तक्षशिला जागृती महिला मंडळाच्या मनोरमा हुमणे, कुसुमताई माउलकर, ललिता कातकर तसेच समस्त बौद्ध उपासक-उपासिकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये