ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांना श्री संत नरहरीनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यांत येणारा श्री संत नरहरी नाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 देऊळगाव राजा या वर्षी नवगण राजुरी बीड येथील भूमिपुत्र वारकरी संप्रदायातील जेष्ठ किर्तनकार धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार 21 मार्च रोजी श्री एकनाथ महाराज यांच्या पुण्यभूमी श्री क्षेत्र पैठण येथे श्री प पू मोहंननाथ महाराज पैठणकर, देऊळगाव राजा यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील विभुतींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल.

श्री जोशी महाराज यांना यापूर्वी समता रत्न पुरस्कार बापू पुरस्कार, एकता पुरस्कार, वारकरी भूषण पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय किर्तन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये