Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मोहिमेअंतर्गत २७ मद्यपी चालकांवर कारवाई

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपुर) : येथे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला, नवीन वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे प्रकार रोखण्यासाठी २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत २७ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय, डिसेंबर महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८१ वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे अधिकारी राहुल मसाडे, इस्माईल पठाण, मंगेश नागरकर, स्वप्निल बोंडे, रवींद्र शेंडे, आणि API अतुल स्थूल यांनी पार पाडली.

वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रकार कमी करण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये