ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम्ही तहसीलदाराला एन्ट्री देतो म्हणत रेती तस्करांची पथकाला धक्काबुक्की

तालुक्यातील पिपरी (देशमुख) रेती घाटातील प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख घाटावरून अवैध रित्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती तलाठ्यांना मिळाली त्या आधारे पोलीस पाटला सह काही पथक कारवाईला गेले असता वाटेतच काही रेती तस्करांनी आम्ही तहसीलदाराला एन्ट्री देतो म्हणत तुम्ही आमचे ट्रॅक्टर का पकडता म्हणून हातात विटा घेऊन या पथकाला धक्काबुक्की करून हे रेती तस्कर प्रसार झाल्याची घटना दिनांक ५ एप्रिल सायंकाळी २ . ३० वाजता घडली मात्र या घटनेची तक्रार पोलिसात दाखल झाली नाही .

पिपरी घाटातून दहा ट्रॅक्टर अवैध रेती उपसा करीत असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पिपरी येथील तलाठी अनिल गहूकर ,चालबर्डी येथील तलाठी विनोद चिकटे ,घोडपेठ येथील कोतवाल संदीप रामटेके ,पिपरी येथील कोतवाल रंजीता डोंगे, पिपरी येथील पोलीस पाटील सुनीता ठोंबरे , त्यांचे पती रत्नाकर ठोंबरे हे रेती घाटावर दाखल झाले हे पथक पाहताच घाटातून दहा ट्रॅक्टर परस्पर इकडे तिकडे पसार झाले यातील एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला त्या पथकाने त्या ट्रॅक्टरचा घेराव घेतला घटना स्थळी सुद्धा काही रेती तस्कर हातात विटा घेऊन उभे झाले आम्ही तहसीलदाराला एन्ट्री देतो आमचे ट्रॅक्टर का पकडता असे म्हणत ते आक्रमक झाले . हे आक्रमक वातावरण पाहता या तलाठ्यांनी तहसीलदाराला फोन द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदारांनी फोनच उचलला नाही त्यानंतर या घटनेची माहिती ठाणेदार लता वाढीवे यांना दिली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे व सहकारी पोलीस घटनास्थळी पाठवले तोपर्यंत येथील रेती तस्कर तलाठी व कोतवाल व पोलीस पाटील यांना धक्काबुकी करून निप्पान डेन्रो परिसरातील जागेवरून पसार झाले ट्रॅक्टर व चालक तसेच उपस्थित रेती तस्कर यांची पुरेपूर माहिती मिळाली नसल्याने भद्रावती पोलिसात तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली

[तहसीलदाराने फोनच उचलला नाही ]

पोलीस पाटील सुनीता ठोंबरे यांनी सांगितले की या घटने संदर्भात पथकातील पटवारी अनिल गहूकर यांनी वारंवार तहसीलदार यांना फोन केला मात्र त्यांनी फोनच उचलला नाही .

[लता वाढिवे ठाणेदार ]

रेती तस्करांच्या प्रकाराबाबत पोलीस पाटील ठोंबरे यांचा फोन आला असता त्वरित मी अधिकार्‍यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले होते. आम्ही पथक तयार केले आहे या कारवाई बाबद माहिती दिली असती तर पोलीस सुद्धा त्यांच्या सोबत असते . आता या घडलेल्या घटनेची तक्रार देणे आवश्यक होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये