लवकरात लवकर मिळणार घुग्घुसला तहसिलचा दर्जा
सामाजिक कार्यकर्ते ईबादूल सिद्दिकी यांच्या मागणीला यश

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर तालूक्यात घुग्घुस येथील २०११ च्या जनगणने नुसार ३२.७२६ लोकसंख्या असणाऱ्या सध्याच्या ५०,००० च्या वर असणाऱ्या घुग्घुस गावाला तहसिलचा दर्जा देण्यात यावे
घुग्घुस नगर परिषदची मंजूरी ३१ डिसेंबर २०२० ला झाली. घुग्घुसची जनगणना २०११ नुसार ३२.७२६ लोकसंख्या होती ती आता जवळपास ५०,००० हजाराच्या वर गेलेली आहे. ३१/१२/२०२० ला घुग्घुस ग्राम पंचायतला नगर परिषदचा दर्जा मिळाला असून खेडेगावातील कष्टकरी शेतकरी, मजूर मजूरी बुडवून, शालेय मुले मुली व अन्य २५ कि. मी. चंद्रपूर तहसिल कार्यालयात येतात. त्याच वेळेवर कार्य पूर्ण होत नाही, घुग्घुसला तहसिलचा दर्जा मिळालेला नसल्यामुळे शालेय मुलांचे नुकसान होत आहे.
घुग्घुसमध्ये नायब तहसिल कार्यालय होते. परंतु इथे अस्थायी स्वरुपाचे नसल्यामुळे हप्त्यातून एक दिवस हजर राहत होते. आता फक्त १५ ऑगष्ट व २६ जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहणाकरीता येतात त्यामुळे घुग्घुस व जवळपासचे घुग्घुस नकोडा, म्हातारदेवी, शेनगाव, उसगाव, पांढरकवडा, सोनेगांव, धानोरा, पिपरी, महाकुर्ला, येरुर, अंतुला, बेलसनी इत्यादी गावांना चंद्रपूर येथे जाण्याकरीता २५ ते १५ कि. मी. ये-जा करावं लागते. त्यात त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी दिवसे दिवस वाट पहावी लागते. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी घुग्घुसला तहसिलचा दर्जा देण्यात यावे, याकरीता सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दिकी यांनी वारंवार पाठपुरावा सादर करीत, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्र मुंबई,
माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिकमंत्री महाराष्ट्र मुंबई, पालकमंत्री चंद्रपुर मागील अनेक वर्षा पासून सतत पत्र पाठपुरावे करीत असतांना अखेर यांच्या प्रयत्नाला यश आले असून, महसूल मंत्रालय यांनी, जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना माहिती अहवाल सादर करण्याकरीता पत्र पाठवला आहे.
घुग्घुस येथील तहसिलचा दर्जा देण्याकरीता अहवालाची प्रत तात्काळ पाठवावे, अखेर सिद्दीकीच्या प्रयत्नाला यश, जिल्हाप्रशासनानी तात्काळ अहवालचे प्रत महसूलमंत्री यांना पाठवावे, अशी मागणी सिद्दिकी यांनी केलली होती, याकरीता माहिती सादर करीत जिल्हाधिकारी यांनी घुग्घुस ला तहसील करण्याकरीता अहवाल महसुल मंत्रालयात पाठविण्यात आले जिल्हा अधिकारी कार्यालय कडून अहवाल पाठवले आहे.
लवकर मिळणार घुग्घूसला तहसीलचा दर्जा
इबादुल सिद्दीकी
सामाजिक कार्यकर्ता, घुग्घुस, जि. चंद्रपूर (म. रा.)