विदर्भ महाविद्यालयात स्वास्थ आणि सिकलसेल तपासणी शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राणीशास्त्र विभाग आणि सिकलसेल ऍनिमिया रोकथाम युनिट चंद्रपूर, ओएनजीसी दिल्ली पुरस्कृत एनआरबीएमआर रिसर्च पुणे संयोजित, विदर्भ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वास्थ आणि सिकलसेल बाबत तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाक्य मॅडम होत्या,त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सिकलसेल हा अनुवंशिक रक्त विकार रोग आहे त्याची वेळोवेळी चाचणी करून त्या रोगाला जागीच थांबवण्यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. असे म्हटले तर सिकलसेल ऍनिमिया सेलचे प्रमुख डॉ. देवेंद्र लिंगोजवर यांनी या सिकलसेल बिमारीबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले. तर समन्वयक डॉ. जाकीर शेख यांनी सुद्धा सिकलसेल बद्दल विस्तृत अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांना तपासणी करिता प्रवृत्त केले. महाविद्यालयाच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सिकलसेल तपासणी केली आणि जे विद्यार्थी काही प्रमाणात संक्रमित आढळले त्यांच्यावरती उपाय व उपचार करण्यासंबंधी त्यांना माहिती दिली. सिकलसेल युनिट कडून महाविद्यालयास सिकलसेल तपासणी किट भेट स्वरूपात देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सचिन यनगंदलवार यांनी केले संचालन प्रा. बोरकर यांनी तर आभार प्रा. सदुलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.