Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे गोंडराजे महात्मा रावण यांची भव्य शोभायात्रा

गोंडियन आदिवासी वीर वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावती यांचे विद्यमाने शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दिनांक 25 ला गोंडियन आदिवासी वीर वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने भिमालपेन पेनठाणा येथून गोंड राजे महात्मा रावण यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

सदर शोभायात्रा बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वारा जवळ आल्यानंतर शोभा यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. सदर शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघून जिल्हा परिषद हायस्कूल येथील कार्यक्रम स्थळी आल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत पारंपारिक आदिवासी वाद्य, आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे नेत्र दीपक देखावे,पारंपारिक आदिवासी नृत्य पथके तथा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सायंकाळी सहा वाजता पारंपरिक गोंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय दुपारी तीन वाजता विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 शोभायात्रेत शहर, जिल्हा तथा जिल्ह्याबाहेरील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये